Food Donation Drive 3

मित्रहो,मागील काही दिवसांपासून स्पंदन फाऊंडेशन मुंबई फूड डोनेशन ड्राइव्ह 3 साठी आपल्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना मदती साठी अपील करत होते. कोरोना महामारीच्या या कठीण काळात आपल्या गरीब आणि निराधार देशबांधवांना मदतीचा हात देता यावा म्हणून टीम स्पंदन सातत्याने प्रयत्न करत होती. आपल्या सर्वांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन टीम स्पंदनला भरभरून मदत केली. आपल्या सर्वांच्या आर्थिक सहकार्यामुळे आम्ही आज 125 कुटुंबांना रेशन किटचे वाटप केले. कांदिवली, बोरिवली , मालाड आणि ठाणे येथील गरीब वस्त्यांमध्ये जाऊन तेथील कुटुंबांना आमच्या स्पंदन सदस्यांनी प्रत्यक्ष जाऊन या किटचे वाटप केले. आज जागतिक मातृदिनाच्या दिवशी या साऱ्या आईंच्या चेहऱ्यांवर आलेले स्मितहास्य पाहून आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी सार्थकी झाला. पुढील आठवड्यात सुद्धा आम्ही परिसरातील अनाथाश्रमाना आणि सिंधुताई सकपाळ यांच्या लहान मुलांच्या संस्थेला मदत करत आहोत. टीम स्पंदन आपण सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रतिसाद बद्दल आपली आभारी आहे.

Leave a Reply

Translate

Discover more from Spandan Foundation, Mumbai

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading