अगले दशहरे पर नए कपड़े,अगली दिवाली पर मिठाई..
वक़्त बीत गया, पर ना कभी वो दशहरा आया, ना दिवाली आयी.
मित्रहो, अशीच अवस्था आपल्या आजूबाजूच्या अनेक अनाथाश्रमां मध्ये अनेक सणांच्या वेळी असते. आपल्या आजूबाजूला सारे लोक उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात असतात पण या गरीब मुलांच्या जीवनातील नैराश्य आणि अगतिकता मात्र कधीच संपत नाही. टीम स्पंदन मात्र न चुकता दरवर्षी आपल्या या अनाथ भावांच्या अंधारमय जगात मदतीचा छोटा दिवा पेटवण्याचे काम करत असते.यावर्षी आम्हाला वात्सल्यमुर्ती पदमश्री सिंधुताई सकपाळ यांनी त्यांच्या मनशांती छात्रालय, शिरूर या संस्थेला मदत करण्यासाठी आवाहन केले होते. माईंच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून टीम स्पंदन ने आपल्या दानशूर मित्रांकडून मदत गोळा करून मनशांती छात्रालयातील या चिमुकल्यांसाठी एका महिन्याचे रेशन तसेच वह्या, पेन, पेन्सिल्स, चित्रकला वह्या, सॅनिटायझर्स, मास्क, रंगीत खडू, कंपास बॉक्स, जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. टीम स्पंदन ने त्यांच्या काही दिवसांचा प्रश्न जरी सोडवला असला तरी त्यांना अजूनही मदतीची गरज आहे. आपल्यातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या चिमुकल्यांसाठी मदत करावी, हि नम्र विनंती.उपरोक्त मदतकार्यासाठी अनुक्रमे मनिषा मोहन, सिद्धेश मोहन, अंजली पवार, रोहन सोनावणे, ऋतुराज जपे, वैभव गायकवाड आणि मंदार भट यांनी आर्थिक तसेच वस्तू रूपाने केलेल्या मदतीसाठी स्पंदन फाऊंडेशन मुंबई त्यांचा आभारी आहे.टीम स्पंदन तर्फे आपल्या सर्व हितचिंतकांना आणि दानशूर मित्रांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा.





