Celebrating Foundation day with childrens of Orphanage

एक कृतार्थ दिवस !

मित्रानो, स्पंदनचा तिसरा वर्धापनदिनाचा कार्यक्रम नुकताच आम्ही दिलखूष आणि स्नेह सदन ह्या अनाथ मूला मुलींच्या आश्रमासोबत साजरा केला..हा आतापर्यंत आम्ही घेतलेल्या अनेक कार्यक्रमांपैकी सर्वोत्तम कार्यक्रम होता. अनाथाश्रमातील मुलांबरोबर खेळताना स्पंदन सदस्यांनी पुन्हा एकदा बालपणातील थ्रिल आणि रोमांच अनुभवले. दुर्दैवाने आपल्या देशात सर्वांचेच बालपण हे आपण अनुभवतो इतके समृद्ध आणि सुंदर नसते याची जाणीव आम्हाला त्या अनाथाश्रमात झाली. मदर तेरेसानी सांगितल्या प्रमाणे ह्या देशातील गरीब आणि अनाथ बालके ही इतर कोणत्याही मदतीपेक्षा मायेची आणि प्रेमाची अधिक भुकेली आहेत. आमच्या सुदैवाने आम्ही सारे स्पंदनचे सदस्य त्या एका दिवसात त्या चिमुकल्यांना जास्तीत जास्त आनंद देऊ शकलो. त्या निष्पाप आणि निरागस मुलांकडे पाहताना , त्यांना छोट्या छोट्या गोष्टींवर आनंदी होताना पाहून, त्यांच्यातली प्रचंड ऊर्जा पाहून आम्हालाही आनंद हा भौतिक गोष्टी मिळवण्यात किंवा खूप साऱ्या गॅझेट्स मध्ये नसून आयुष्य भरभरून आणि उत्साहाने जगण्यात आहे याचीही जाणीव झाली.. समाजातल्या आपल्या त्या लहान भावा बहिणींना आपल्या आर्थिक मदतीने आम्ही शालेय साहित्य, क्रीडा साहित्य आणि भोजनदान करू शकलो. त्या वस्तू मिळाल्यावर मुलांचा आनंद नक्कीच द्विगुणित झाला होता. आमचा मित्र अभय जो स्वतः एक बालगृहातील अनाथ असून आणि सध्या फोर्स वन चा कमांडो आहे त्याने आणि त्याच्या मित्रांनी कार्यक्रमाला येऊन आणि एक छान डोक्यूमेंट्री दाखवून कार्यक्रमाला खरेच खूप रंगत आणली.. अभय ने सांगितलेले त्याच्या पूर्वायुष्यातील अनुभव आणि त्याने केलेला संघर्ष ऐकून आणि त्याने ज्या जिद्दीने आणि परिश्रमाने यश संपादन केलेय आणि जे अभिमानाचे आयुष्य तो जगतोय तो सर्व अनाथ बालकांसाठी आणि स्पंदनसाठीही खूप प्रेरणादायी आहे. आयुष्यात इतरांसाठी काम करत असताना आपल्याजवळ समाजाला मदत न करण्याचे आणि इतरांसाठी काही काम न करण्याचे आणि टाळण्याचे खूप सारी कारणे असतात पण इतका बिझी असूनही वेळ काढून तो त्याच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्या अनाथ भाऊ बहिणींना मोठे करण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी घालवतोय हे पाहून त्याचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटला..सर्व स्पंदनच्या टीमने आपल्या उत्कृष्ट नियोजन कौशल्याने कार्यक्रम एकदम यशस्वी पार पाडला.सर्व स्पंदन टीम मेंबर्स , आपले हितचिंतक आणि देणगीदार या सर्वांनी आपल्या अनाथ बंधू भगिनींच्या आनंदाच्या क्षणांचे भागीदार होऊन एक उत्कृष्ट आणि न विसरता येण्याजोगा अनुभव स्पंदनला दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार..

Leave a Reply

Translate

Discover more from Spandan Foundation, Mumbai

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading