शहर के अंधेरे को एक चराग काफी है…
सौ चराग जलते है..एक चराग जलने से…
या शायरीला जागत कोल्हापूर आणि सांगली येथे आलेल्या भयंकर महापुराच्या महासंकटाचा मुकाबला करण्यासाठी आणि तेथील जनतेला मदत करण्यासाठी स्पंदन फौंडेशन मुंबई ने आपल्या मित्र परिवाराला, सुजाण नागरिकांना एक गोणी मदतीची असे आवाहन केले होते.. आठवड्या भरात स्पंदन फाऊंडेशन कडे प्रचंड मदत गोळा झाली. ही मदत प्रत्यक्ष पूरग्रस्तांना मिळावी आणि त्यांच्या वेदना समजून घेऊन ह्या दुःखाच्या आणि संकटसमयी ते एकटे नसून त्यांच्या संघर्षात आम्हीही सामील आहोत हे त्यांना जाणवून देण्यासाठी टीम स्पंदन चे 10 क्रियाशील आणि तडफदार कार्यकर्ते सर्व मदतीचे साहित्य घेउन कोल्हापूर येथे गेले होते.त्यांनी पूरग्रस्त गावामध्ये घराघरांत फिरून ही मदत लोकांमध्ये वाटली. महिलांना साड्या देण्यापासून ते शाळकरी मुलांना दप्तर, वह्या पुस्तके अशी सर्व मदत त्यांनी प्रत्येक घरात दिली . गावातील सर्व लोकांनी अतिशय भावुकपणे टीम स्पंदन कडे कृतज्ञता व्यक्त केली.. टीम स्पंदन तुम्हा सर्व मदत करणाऱ्या हातांचे आभार मानते.
तुम्ही दाखविलेल्या विश्वासाबद्दल टीम स्पंदनची सामाजिक काम करण्याची उर्मी अधिक बळकट झाली आहे. देशाच्या आणि समाजाच्या संकट काळात साथ देण्यासाठी आणि संघर्ष करण्यासाठी स्पंदन फौंडेशन कायमच अग्रभागी राहील याची आम्ही खात्री देतो.

