इस दशहरे मे आओ ऐसा कुछ करें
इनका भी घर हम खुशियों से भरें..
या उक्तीला जागत स्पंदन फाऊंडेशन मुंबई ने आज आपला वर्धापनदिन आणि विजयादशमीचा उत्सव मालाड मालवणी येथील लहान मुलींच्या अनाथाश्रमात साजरा केला. त्या लहान मुलींचा वेळ कपडे धुण्यात जाऊ नये आणि त्यांना अभ्यासासाठी आणि खेळा साठी वेळ मिळावा म्हणून आम्ही त्यांना त्यांचा मागणी प्रमाणे एक नवीन वॉशिंग मशीन आणि एक महिन्याचा धान्यपुरवठा केला. टीम स्पंदनच्या मुलींनी त्या मुलींसोबत नृत्य आणि गायन कला सादर करत त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलवले.
टीम स्पंदनचा वर्धापनदिन आणि विजया दशमीचा उत्सव योग्य ती काळजी घेऊन प्रसन्न आणि आनंददायी वातावरणात साजरा झाला.
आपणही असाच उत्सवाचा आनंद समाजातील दुर्बल घटकांना सोबत घेऊन साजरा कराल ह्या अपेक्षेसह तुम्हा सर्वांना विजया दशमीच्या खूप खूप शुभेच्छा.




