Donated 7 computer sets, printer, water purifier, cupboards, stationery to a rural school in Devgad.

मित्रहो,

स्पंदन फाउंडेशन, मुंबई सातत्याने गेले अनेक वर्षे मुंबई , ठाणे येथील दुर्गम आणि गरीब गावातील शालेय विद्यार्थ्यांना मदत करीत आहे. अतिरिक्त शिकवणी वर्ग , वह्या पुस्तके आणि इतर शालेय साहित्य देऊन ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम आम्ही करत आहोत. विद्यार्थ्यांना आत्मबळ देण्याचे हे कार्य पाहून आम्हाला राज्यातील इतरही अनेक शाळां मधून विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन करण्यात येत होते. 

त्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आणि आमच्या शैक्षणिक कार्याचा फायदा राज्यातील इतर शाळांना सुद्धा व्हावा या हेतूने आम्ही कोकणातील किंजवडे ,देवगड येथील आदर्श विद्यामंदिर या शाळेसाठी संगणक कक्ष, वॉटर प्युरिफायर, कपाटे देण्याचे ठरवले. भारतीय स्टेट बँकेच्या मदतीने आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संगणक कक्ष तयार केला आहे जेणेकरून आमचे ग्रामीण विद्यार्थी बांधव तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आपले कौशल्य सिद्ध करू शकतील. आमच्या टीम स्पंदन ने प्रत्यक्ष जाऊन शाळेला या सर्व गोष्टी भेट दिल्या. 

शाळेचे विश्वस्त , शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी टीम स्पंदन च्या या भरीव योगदाना बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आम्हा टीम स्पंदनच्या सभासदांसाठी आजच्या दिवस अत्यंत अभिमानाचा होता. टीम स्पंदन तुम्हा सर्व मित्र परिवाराचे आणि हितचिंतकांचे आभारी आहे. ह्या सर्वांच्या आर्थिक योगदाना शिवाय हे सारे शक्य नव्हते. 

आम्ही सातत्याने वर्षभर या शाळांना आणि विद्यार्थ्यांना ताकद पुरविण्याचे काम करणार आहोत. आपणास ही या शैक्षणिक विकासाच्या कार्यात सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही आम्हाला मदत करू शकता.


Spandan Foundation, Mumbai has been doing social work in Mumbai, Thane and remote areas of Palghar. We have been empowering and motivating students to continue their education despite facing all odds by helping them with coaching support and providing stationery, books, notebooks, etc. 

Our work is being noticed throughout the state by many school and Colleges. We have been requested by many rural schools to support furthering the education cause for their students. Team Spandan decided to extend its area of social work and offer the benefit to other schools in other districts. We have donated computer lab, water purifier, cupboards, printer and stationery to the Adarsh Vidya Mandir, Kinjavde. With the help of the State Bank of India, we were able to provide computer sets to the school. This was to make our rural brothers and sisters techno-savvy.

Today we went there and donated all the mentioned things directly to the school. School’s trustee, teaching staff and students expressed their deepest gratitude towards Spandan foundation for this great support. We want to thank all our friends and well-wishers who have continuously supported our activities.

It wouldn’t have been possible without your financial support. We have been doing and we will continue to support the educational development of the underprivileged students. If you also want to be part of our mission and be the agent of change.

Leave a Reply

Translate

Discover more from Spandan Foundation, Mumbai

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading