Donated handwash and masks to the transgender people at Sakhi Char Chaughi Trust, Malad

Today, we donated handwash bottles and masks to the transgender people at Sakhi Char Chaughi Trust,Malvani,Malad West. We are thankful to Mr Sharad Sonkar for providing the necessary material and thus supporting our mission.

From the Founder’s desk-

.. कुंपणापलिकडचं जगणं

आज सकाळी साधारण 11.30 ची वेळ. स्पंदन फाऊंडेशन मुंबईचे आम्ही 3 सदस्य मास्क आणि सॅनिटायझर्स घेऊन चारकोपहून मालवणीला जायला निघालो. मालवणीला पोहोचल्यावर बराच वेळ आम्हाला दिलेला पत्ता सापडत नव्हता. पुन्हा पुन्हा त्याच त्याच मार्गाने आम्ही इकडे तिकडे फिरत होतो. शेवटी बऱ्याच वेळाच्या भटकंतीनंतर पत्ता सापडला. तिथे पोहोचल्यावर पाहतो तर काय? संस्थेच्या कार्यालयाला कुलूप ? मी गौरी सावंत यांना फोन केला. त्या म्हणाल्या दोनच मिनिटात मी पोहोचते.

अगदी सांगितल्या प्रमाणे दोन मिनिटात त्यांचं आगमन झालं . त्यांच्या सहकार्‍याने कार्यालय उघडले. कार्यालयाचं डागडुगीचं काम सुरू असल्यामुळे आम्हाला जागा मिळेल तिथे आम्ही बसलो. आम्ही आमच्या संस्थेची त्यांना माहिती देत होतो. तेव्हा एकाच वेळी त्यांचं त्यांच्या सहकाऱ्यानाही सूचना देण्याचं काम सुरु होतं. चर्चा सुरु असताना त्यांच्याकडून असं कळलं की त्या आमच्या क्लासेसच्या माजी विद्यार्थीनी आहेत. आम्हाला नारळपाणी सक्तीने प्यायला दिलं. ते घेतल्यावर ज्या कामासाठी आम्ही गेलो होतो. त्याला सुरुवात झाली.

त्या भागात साधारण 600 तृतियपंथी लोकं राहतात. त्यातील काही प्रमुखांना बोलावून त्यांचा जवळ किती लोकं राहतात त्याप्रमाणे मास्क आणि सॅनिटायझर दिले. त्या नंतर पुन्हा आमच्या चर्चेला सुरुवात झाली. गौरी यांच्याकडून ज्या ज्या गोष्टी कळल्या त्यांनी आम्ही स्तब्ध झालो. सर्वप्रथम त्यांनी स्वतः बद्दल सांगितले. घरच्यांचा त्यांना घरी ठेवण्यास असलेला विरोध असो किंवा त्यांना मिळालेली वागणूक असो. अशा अनेक गोष्टी उलगडत गेल्या.16 दिवसापूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. परंतू त्यांना कुणीही कळवले नाही. त्यांना वडिलांच्या मृत्यूची बातमी सोळा दिवसांनी कळली. त्या म्हणाल्या, ” मी आज प्रसिध्द झाले आहे. सर्व लोकं मला ओळखतात. जर मी मुलगा म्हणून जन्माला आले असते तर एवढं करू शकले असते ? ” त्यांचा हा प्रश्न आम्हाला निरुत्तर करून गेला.

तेवढ्यातच त्या बाहेर गेल्या. कुणालातरी भेटून आल्या. आल्यावर आम्ही पाहिले त्यांच्या डोळयात पाणी होतं. त्यांनी सांगितले एका तृतियपंथीयाने दत्तक घेतलेल्या मुलगीचा चार दिवसापूर्वी मृत्यू झाला. त्या पुढे म्हणाल्या, ” प्रत्येक तृतियपंथी एक मुलगी सांभाळायला घेतो. त्यासाठीच ते रस्त्यावर, घरोघरी फिरून पैसे मागत असतात. बहुतेक मुली वेशांच्या, एच आय व्ही झालेल्यांच्या असतात. त्यांनी सांभाळायला घेतलेली मुलगी आज अमेरीकेत डेंटल सर्जनचा अभ्यास करीत आहे . ” लॉकडाऊन मध्ये या तृतियपंथी समाजाला फार हाल अपेष्ठा सहन कराव्या लागल्या. त्यांना कुणीच मदत केली नाही.

त्यांना कार्यालयीन बरीच कामं करायची होती म्हणून आम्ही त्यांचा निरोप घेतला. परंतू त्यांच्या सोबत घालवलेला साधारण एक तास बरंच काही शिकवून गेला. यापुढे कुणी तृतियपंथी व्यक्ती भेटला तर त्याचा आदर करा. त्याला मदत करा कारण कुंपणापलिकडचं आयुष्य ते जगत असतात आणि आपल्या सोबत आणखी एक जीव वाढवत असतात. समाजाने नाकारलेल्या या समूहाला आदरयुक्त आधाराची गरज आहे.

-Pamod Mohite

Leave a Reply

Translate

Discover more from Spandan Foundation, Mumbai

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading