स्पंदन फाऊंडेशन मुंबई तर्फे महानगर पालिका शाळा, चारकोप येथे इ.10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शनिवार दिनांक 5 मार्च 2022 पासून विषय निहाय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . पहिल्या दिवशी बीजगणित आणि विज्ञान 1 या विषयांचे अनुक्रमे रविंद्रनाथ कामथ सर आणि सचिन ठाकूर सर यांच्या अनमोल मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.






