Donating bicycles to needy students of Makunsar village of Palghar district

स्पंदन फाउंडेशन मुंबई ने आज एस.के. पाटील विद्यामंदिर, माकुनसार पालघर मधील काही शाळकरी विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप केले. ही मुले आपल्या घरापासून 3-4 किमी रोज पायी ये-जा करायची. मुलांची शाळा खूप दूर असल्याने पावसाळ्यात अनुपस्थितीचे प्रमाण ही होते. शाळेतील विद्यार्थ्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून शाळेतील शिक्षकांनी स्पंदन टीमला मदतीची हाक दिली होती. आम्ही त्यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन त्या गरीब आणि हुशार विद्यार्थ्याना नव्या सायकलींचे वाटप केले. सायकल मिळाल्यावर त्यावर बसून शाळेला येणाऱ्या मुला मुलींच्या चेहऱ्यावरचे कौतुकाचे भाव पाहून टीम स्पंदनचे सदस्य सुद्धा खूप भारावून गेले. स्पंदन फाउंडेशनने मागील आठवड्यात पालिका शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांना एसएससी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासाठी विषयवार तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन पर शिबिर आयोजित केले होते. दुर्गम आणि खेड्यापाड्यातील गरीब आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्याना शिक्षण घेणे सोपे आणि सुखकर जावे म्हणून टीम स्पंदन सातत्याने प्रयत्नशील आहे. आम्हाला सतत प्रोत्साहन देणाऱ्या आमच्या देणगीदारांचे आणि मित्रांचे या निमित्ताने खूप खूप आभार.

Leave a Reply

Translate

Discover more from Spandan Foundation, Mumbai

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading