माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे जी यांनी गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात रक्ताचा प्रचंड तुटवडा असल्याने जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत स्पंदन फाऊंडेशन मुंबई तर्फे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवली येथे रक्तदान करण्यात आले. आमच्या जिगरबाज सदस्यांनी आणि काही मित्रांनी आजूबाजूला कोरोनाच्या भीतीचे सावट आणि तणावाचे वातावरण असून सुद्धा या संकटकाळात घराबाहेर पडून आणि सरकारचे आरोग्य विषयक नियम पाळत रक्तदान केले. आपणही या राष्ट्रीय संकटाच्या काळात रक्तदान करून सरकारकडे अधिकाधिक रक्तसाठा उपलब्ध राहील याची काळजी घ्या आणि रक्तदान करण्यासाठी नजीकच्या रक्तपेढीत जा. आपण सर्व जागरूक राहू….. कोरोनाशी लढू…

