Food Donation during Covid-19 Pandemic: 1200 plates served

मित्रहो,

गेले कित्येक दिवस कोरोनाच्या अभूतपर्व संकटा मध्ये रोजगार, कारखाने आणि उद्योगधंदे बंद असल्याने अनेक मजूर, श्रमिक भीषण आर्थिक संकटात आहेत. दिवसभर प्रचंड मेहनत करून संध्याकाळी आपल्या कुटुंबासाठी स्वाभिमानाची रोजी रोटी कमवून आणणारे आपले कामगार बांधव रोजगारा अभावी अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. त्या मजुरांना गेले 40 दिवस चारकोप मधील एक युवा कार्यकर्ता श्री संजय सावंत हे आपल्या शिवप्रभा सेवा सहकारी संस्थेच्या वतीने रोज दिवसातून दोन वेळा अन्नदान करत आहेत. भोवतालच्या गरीब वस्त्यांमधील 300-400 मजुरांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सकाळ संध्याकाळ जेवण देणे आणि सोबत आरोग्य विषयक नियम पाळणे या दोन्ही गोष्टी ही संस्था अतिशय सुंदर रीत्या करत आहे.

आज स्पंदन फाऊंडेशन मुंबईच्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ह्या अन्नदान कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन त्या संस्थेला अन्न वाटपाच्या कार्यात मदत केली. तसेच आम्ही सर्व सदस्यांनी आपल्या मासिक बचतीतून आपला खारीचा वाटा म्हणून संस्थेला आर्थिक मदतही केली. स्पंदन फाऊंडेशन गेल्या काही दिवसात सातत्याने रक्तदान शिबिर, गरीब कुटुंबांना 15 दिवसांचा अन्नधान्य पुरवठा आणि 50 कुटुंबांना प्रत्येकी एक हजार रुपये या प्रमाणे आर्थिक मदत केली आहे. अजूनही अनेक गरीब वस्त्यांमधुन आम्हाला मदतीसाठी विनंती केली जात आहे.

मानवी इतिहासातील या भयंकर संकटात आपल्या समाजातील गरीब आणि निराधार कुटुंबांना स्पंदन फाऊंडेशन आपल्या दिलदार आणि जबाबदार मित्रांच्या सहाय्याने अजूनही मदत करण्यास तयार आहे. आपणास ह्या सामाजिक बांधिलकीच्या कार्यात हातभार लावायचा असल्यास आपण आमच्या खालील सदस्यांशी संपर्क साधू शकता. प्रमोद मोहिते – 9619037586सचिन ठाकूर – 9152174841

Leave a Reply

Translate

Discover more from Spandan Foundation, Mumbai

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading