Diwali gift to tribal students: Educational and essential material worth lakhs of rupees

अँधेरा बहुत है, दर्द बहुत है,

रास्ता बहुत लम्बा है..लेकिन दिया जलाना

और मुस्कुराना कहाँ मना है..

इसी तरह बहुत सारे चिराग जल जायेंगे मोहब्बत के..

तो ये दर्द के अँधेरे ज़रूर मिट जायेंगे..


स्पंदन फाऊंडेशन मुंबई ने नेहमीप्रमाणे दिवाळीचा आनंद फक्त स्वतः पुरता मर्यादित न ठेवता समाजातील वंचित आणि गरीब विद्यार्थ्यांना ह्या आनंदाचे भागीदार होता यावे म्हणून या वर्षीची दिवाळी डहाणू, कैनाड मधील गरीब शालेय विद्यार्थ्यांसोबत साजरी केली. आमच्या काही समविचारी आणि दिलदार मित्रांनी आम्हाला आर्थिक पाठबळ देऊन आम्हाला त्यांचा आनंद द्विगुणित करण्याची संधी दिली. आम्ही त्यांना दिलेल्या हिवाळी स्वेटर,शूज आणि इतर साहित्य ह्या नवीन वस्तू मिळाल्यावर त्या मुलांच्या चेहऱ्यावर पसरलेला सुप्त आनंद हीच आमच्या दानशूर मित्रांना मिळालेली पोचपावती आहे. आम्ही स्पंदन कार्यकर्त्यांनी त्या मुलांसोबत संवाद साधून त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत वारली नृत्य, शालेय खेळ खेळून आमचेही बालपण जगलो.


टीम स्पंदन ने शालेय मुलांना पुढील वस्तू दिल्या.

1. 368 हिवाळी स्वेटर

2. 368 चपलांचे जोड

3. 368 वॉटर बॉटल्स

4. 368 कोलगेट, ब्रश आणि साबण जोड

5. सॅनिटरी पॅड

6. मैदानी खेळाचे साहित्य

7.शाळेसाठी पंखे

8. दिवाळीचा फराळ

मुलांनी सदर वस्तू मिळाल्यावर प्रचंड जोश व्यक्त केला. ह्या वर्षीची दिवाळी ही नक्कीच त्यांच्यासाठी अविस्मरणीय राहणार आहे. शालेय शिक्षक आणि शिक्षण निरीक्षक साहेबांनी स्पंदन चे प्रचंड कौतुक करून आमच्या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला.

टीम स्पंदन पुन्हा एकदा तुम्हा सर्व दिलदार आणि गरीब मुलांबद्दल खूप जिव्हाळा असणाऱ्या मित्र परिवाराचे, हितचिंतकांचे आभार मानते आणि तुम्हालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते..

Leave a Reply

Translate

Discover more from Spandan Foundation, Mumbai

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading