स्पंदन फाऊंडेशन मुंबईच्या सदस्यांनी वाडा तालुका पालघर ठाणे येथील दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना दोन दिवसीय अभ्यास शिबिरात सहभाग घेतला. मुंबई उपनगरातील सुविख्यात आणि तज्ज्ञ शिक्षक श्री. प्रमोद मोहिते सर, श्री.सचिन ठाकूर सर, श्री.रवींद्रनाथ कामत सर यांनी सदर विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले.सदर शालेय विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचे भीषण दुर्भिक्ष जाणवते आहे. स्पंदन फाऊंडेशन तर्फे शेजारील विहिरीतून पाणी शाळेच्या आवारात आणण्यासाठी यंत्र सामुग्री सुद्धा देणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल.

